solar pumpसोलार पंपासाठी पेमेंट चे ॲप्शन आले पण त्याआधी असा करा सेल्फ सर्वे
शेतकरी मित्रांनो नमस्कार कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकर्यानी अर्ज सादर केले होते आणि जे शेतकरी यामध्ये पात्र झाले आहे, अश्या शेतकर्याला आता पेमेंट चे ॲप्शन येने सुरू झाले आहे. परंतु हे पेमेंट करण्याआधी शेतकर्याला एक सेल्प सर्वे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरी हा सेल्फ सर्वे काय आहे आणि तो कसा करावा याबाबत अधिक माहिती या लेखात जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो या सेल्फ सर्वे मध्ये तुमच्याकडे सिंचनाचा स्रोत कोणता आहे, त्याचबरोबर मि याआधी कोणत्याही प्रकारच्या सोलार पंपाचा लाभ घेतलेला नाही अश्या प्रकारच्या अटी चे पालन करत आहे असे मान्य करावे लागेल. तसेच तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचन साधनाच्या सोबत एक फोटो, जमीनीचा फोटो, तुमची सही या सेल्फ सर्वे मध्ये करावे लागेल. तसेच हा सेल्फ सर्वे तुम्हाला तुमच्या शेतात जेथे सोलार पंप बसवायचा आहे तेथे करावा लागेल. हा सेल्फ सर्वे केल्यानंतर तुम्हाला सोलार पंपासाठी पेमेंट करता येनार आहे.
हा सेल्फ सर्वे कसा करावा यासाठी तुम्हाला सर्वप्रथम meda-beneficiary हे अॅप डाउनलोड करा ॥
त्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी करावी यासाठी खालील YouTube video पहा