पंजाबराव डख यांचा नविन हवामान अंदाज पुन्हा ढगाळ वातावरण havaman aandaj
पंजाबराव डख यांनी दि 21- डिसेंबर रोजी पुढील हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजा नुसार राज्यात 21- डिसेंबर पासुन ते 26- डिसेंबर पर्यत कडाक्याची थंडी राहनार असुन पुढे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण तयार होईल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
या तारखे दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहिल
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात 27- डिसेंबर पासून राज्यात ढगाळ वातावरण तयार होनार असुन हे ढगाळ वातावरण 30 डिसेंबर पर्यंत राहिल. तरी या अंदाजानुसार आपल्या पिकाचे नियोजन करावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले. अचानक जर वातावरणात बदल झाला तर मेसेज द्वारे कळवण्यात येईल .
हरबरा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हरबरा पिकात ढगाळ वातावरणामुळे मर जास्त आढळुन येते त्यासाठी सुकलेले झाडे काढून घ्यावी आणि शेताबाहेर काढावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख प्रसिद्ध असून राज्यातील शेतकर्याचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे.