मेंडोस चक्रीवादळ निवळले पण राज्यात विजासहित पाऊस Cyclone Mendos


मेंडोस  चक्रीवादळ निवळले पण राज्यात विजासहित पाऊस Cyclone Mendos 

Cyclone Mendos




आज दि.11-डिसेंबर 2022- हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले Cyclone Mendos मेंडोस चक्रीवादळाची तिव्रता कमी होत ते आता पुर्णपणे ओसरलेले आहे आणि त्याचे कमी दाबात रुपांतर झाले आहे. परीणामी राज्यात पावसासाठी अनुकुल वातावरण तयार झाले आहे. आजपासून राज्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


बंगालच्या उपसागरात तयार झालेले  Cyclone Mendos  चक्रीवादळ सध्या पुर्णपणे ओसरलेले आहे आणि त्याचे कमी दाबात रुपांतर झाले आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे.  Cyclone चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 



 Cyclone Mendos  मेंडोस चक्रीवादळाची तिव्रता कमी झाली असली तरी सध्या  संपूर्ण राज्यात  ढगाळ वातावरण तयार झाले असून काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या असतील.पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे राज्यातील थंडी  काहीही कमी होईल. थंडीला आठवडाभर आतकाव होण्याची शक्यता आहे 




आज
राज्यात या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता

मेंडोस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे Cyclone Mendos  राज्यात ठिक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दि. 11-12-2022 रोजी  अहमदनगर, संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता  असल्याची माहिती हवामान विभागाचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटर  च्या माध्यमातून दिली आहे.

 

शेतकऱ्यांला महत्त्वाचा सल्ला राज्यात अवकाळी पाऊस पंजाबराव डख✅👇👇

 



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने