आजचा हवामान अंदाज havaman andaj दि.26-जुलै 2022
राज्यात गेल्या काहि दिवसापासुन रीमझीम पावसाने हजेरी लावलेली असुन हि स्थिति पुढचे काहि दिवस राहण्याची शक्यता आहे.कशी माहिती हवामान विभागाचे तज्ञ k.s.hosalikar यांनी दिली आहे.मागिल काही दिवसापासुन पुर्व विदर्भ तसेच राज्याच्या काही ईतर भागात जोमदार पावसाच्या सरी बरसल्या.
दि.26-जुलै 2022 चा हवामानाचा अंदाज..
आज दि.26-जुलै रोजी विदर्भात गडचिरोली, भंडारा, वर्धा,हिंगोली, चंद्रपुर, यवतमाळ, आमरावती तसेच मराठवाड्यातील नांदेड,परभणी, लातुर, बीड, धाराशिव त्याचबरोबर मध्यमहाराष्ट्रात सोलापुर,सांगली, कोल्हापुर, सातारा,पुणे आणि नगर या जिल्ह्यात विजासहित मध्यम ते जोमदार पावसाची शक्यता व उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याकडुन देण्यात आली आहे.
दि.27-जुलै 2022 चा हवामान अंदाज..
27-जुलै रोजी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुर, सातारा,पुणे,सांगली, नगर,सोलापुर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातुर, परभणी, हिंगोली,नांदेड, आणि विदर्भातील यवतमाळ, आमरावती,वर्धा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता राहिल व बाकीच्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहिल.