pm kusum solar हे शेतकरी कुसुम सोलर योजनेस पात्र नसतील !
शेतकर्याला दिवसा सिंचण करणे शक्य व्हावे , डिझेलचा वापर कमी व्हावा यासाठी सरकारकडुन सौर कृषी पंप दिले जातात. सौर पंपासाठी सरकार कडुन 90% अनुदान दिले जाते. Kusum solar yojana अंतर्गत महाराष्ट्रात एक लाख सोलर पंपाचे उदिष्टाने हि योजना राबवली जात आहे.
भरपूर शेतकर्याकडुन यापुर्वीच्या विविध योजनेअंतर्गत सोलार पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करुन दुबार लाभ घेत असल्याचे महाउर्जाच्या निदर्शनास आले आहे.
हे शेतकरी कुसुम सोलर योजनेस पात्र नसतील ! pm kusum solar
अटल सौर कृषीपंप योजना -1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी पिएम कुसुम घटक -ब योजनेसाठी पात्र राहनार नाही. त्यामुळे यापुर्वी लाभ घेतलेल्या शेतकर्यानी महाकृषी ऊर्जा अभियान पिएम कुसुम घटक -ब योजनेच्या पोर्टलवर अर्ज करु नये.अर्ज नोंदवल्यास त्यांचा अर्ज रद्द ठरवण्यात येईल. पिएम कुसुम घटक -ब अंतर्गत एका शेतकर्यानी एकाच पंपासाठी अर्ज करावा.एका लाभार्थ्यानी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ईतर अर्ज रद्द करण्यात येतील.
वरील योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी हे सौर कृषीपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषीपंप महाकृषी ऊर्जा अभियान पीएम -,कुसुम घटक -ब योजनेअंतर्गत आस्थपित करून घेतात.ही बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषीपंप काढून घेण्यात येईल.या शेतकर्यांनी भरलेला लाभार्थी हिस्सा जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांविरुद्ध एफआयआर करण्यात येईल.असे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या अधिकाऱ्याने कळविले आहे pm kusum solar