गोट कांदा लागवड,अशा पध्दतीने करा कांदा बिजोत्पादन/Got Kanda Lagv

 

 गोट कांदा लागवड,अशा पध्दतीने करा कांदा बिजोत्पादन/Got Kanda Lagvad

गोट कांदा लागवड
 

  गोट कांदा लागवड, रब्बी हंगामात आनेक शेतकरी गोट कांदा लागवड करत आसतात,याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. काही ठिकाणी गोट कांदा, काही ठिकाणी डेंगळ्याचा कांदा, कांदा बिजवाई,कांदा बिजोत्पादन, टोळ कांदा अशा वेगवेगळ्या नावाने याची ओळख आहे.तर या गोट कांदा लागवडीविषयी सविस्तर माहिती आपण बघनार आहोत.यामध्ये गोट कांदा लागवडीसाठी जमीन कशी आसावी,जमीनीची मशागत, कांदा निवड,लागवडीसाठी अंतर,खत व्यवस्थापन, मर रोग येऊ नये यासाठी उपाययोजना याबद्दल सविस्तर बघूया.

गोट कांदा लागवडीसाठी जमीन-
गोट कांदा लागवड साठी काळी कसदार, पान्याचा उत्तन निचरा होनारी जमीन निवडावी.हालकी, मुरमाड,चोपनयुक्त जमीन निवडू नका लहान आकाराचे गोंडे येऊन कमी उत्पादन मिळते. म्हणून काळीच्या कसदार जमिनीत कांदा बिजोत्पादन घ्यावे.जमिनीत रोटाववेटर आणि बैलपाळी मारून मशागत करावी,काडीकचरा वेचून जमीन तयार करावी.

 


लागवडीसाठी कांदा निवड
गोट कांदा लागवड साठी कांद्याची निवड अतिशय महत्त्वाची आहे. जर आपण एखाद्या कंपनीसाठी कांदा बिजोत्पादन घेत असाल तर कंपनी आपल्याला कांदा देईल पण जर आपण स्वतः बिजोत्पादन करत आसाल तर कांदा निवड योग्य आसनं गरजेचे आहे.
1)कांदा 5-6 महिने जुना आसावा.
2)कापल्यानंतर कांद्याला एकच केंद्र असावे.
3)कांदा साधारणपणे 70-80 ग्रँम वजनाचा आसावा
4)कांद्याला आगोदरचं पात फुटलेली नसावी.
5)टरपल गेलेले नसावे.
अशा प्रकारच्या कांद्याची निवड कांदा बिजोत्पादन साठी करावी.निवडलेल्या कांद्याचे 20-25%भाग वरच्या साईडने कापून घ्यावा जेने करुन भरपूर फुटवा मिळतो.
 

लागवडीसाठी आंतर-
गोट कांदा लागवडीच्या दोन तीन पद्धती प्रचलित आहेत. काही शेतकरी सिंगल ओत तर काही शेतकरी जोडओळ पद्धतीने कांदा लावतात.जर जोडोळ पद्धतीने लावत असाल तर 5 किंवा 4 फुट अ़तर निवडावे.आणि जर एकच ओळ लावत आसाल तर 3-3.5 फुट एवढे आंतर निवडावे.साधारणपणे एक एकर कांदा लागवडीसाठी 10-15 क्विंटल कांदा लागतो.आपल्या लागवड पद्धत आणि कांद्याच्या साईझनुसार आवलंबून आहे.
 



बिजप्रक्रीया-
गोट कांदा पिकामध्ये मर रोग येत आसतो हा रोग यायला नको यासाठी बिजप्रक्रीया गरजेची आहे. बिजप्रक्रीया करन्यासाठी कापलेले कांदा बुरशीनाशकाचा द्रावणात बुडवून घ्यावे आणि नंतर लागवड करावी. बिजप्रक्रीया साठी साफ,रोको,बाविष्टीन, M45,या बुरशीनाशकाचा वापर करू शकता.
 

खत व्यवस्थापन-

गोट कांदा लागवडीसाठी खत व्यवस्थापन खुप महत्त्वाचे आहे.जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन करनं महत्त्वाचे ठरते.गोट कांदा लागवड करताना आपन (10.26.26),(12.32.16)-(18.46.00)-(14.35.14) यासारख्या खताचा वापर करू शकता सोबत एकरी 10-15 किलो सल्फर वापरावे. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सल्फर वापरनं आवश्यक आहे. अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करावे.
 
x
गोट कांदा लागवडीनंतर शेतात पाणी साचून राहनार नाही एवढंच पाणी द्यावे. पाणी साचेल एवढ पाणी दिल्याने मर रोग वाढू शकतो आणि त्यावर नियंत्रण मिळवने कठीण जाते.योग्य प्रमाणात पाणी दिल्याने मर होत नाही.

 



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने