या जिल्ह्यात जोमदार पावसाची शक्यता-havaman andaj-IMD
नमस्कार शेतकरी मित्रांनो सततच्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.तशात हवामान विभागाकडुन पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे .कोकनासह मध्यमहाराष्ट्रात तसेच विदर्भात जोमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.पाहुया सवीस्तर :
कोकण : कोकनातील रायगड, रत्नागिरी आणि मध्यमहाराष्ट्रात पुणे, सातारा या जिल्ह्यात आँरेज अलर्ट दिला असुन या जिल्हात मुसलधार पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे,पालघर या जिल्ह्यात यलो अलर्ट दिलेला असुन या जिल्ह्यात जोमदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडुन देण्यात आली आहे.
विदर्भ : विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपुर, वर्धा, आमरावती, या जिल्ह्यात आयएमडी कडुन यलो अलर्ट देण्यात आला असुन या जिल्ह्यात मुसलधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात नाशीक, धुळे, नंदुरबार, जलगाँव या विजेच्य कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडुन देण्यात आला आहे.
तसेच उर्वरीत महाराष्ट्रात मध्यम ते जोमदार पावसाची शक्यता हवामान विभागाचे तज्ञ k.s.hosalikar यांनी वर्तवली आहे.