Cotton bhav : कापूस बाजार टिकेल का?भाव पुन्हा वाढतील का?

 

Cotton bhav : कापूस बाजार टिकेल का?भाव पुन्हा वाढतील का?

 


 Cotton bhav - मागील दोन दिवसात वायदे (Future market) आणि बाजार समित्यांमधील कापूस दरात (Cotton Rate) मोठी नरमाई पाहायला मिळाली.भाव घसरल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरन तयार झालंय. आज कापूस दरात क्विंटलमागे सरासरी 500 रुपयांपर्यंत दर कमी झाले आहेत.

 
कापूस भाव पुन्हा वाढतील का? कापूस बाजार टिकेल का?Cotton bhav

    काल वायद्यांमध्ये कापसाचे दर गाठीमागे 1640 रुपयाने कमी झाले. वायदे 27 हजार 400 रुपयांवर होते. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर हा दर 16 हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. तर बाजार समित्यांमध्येही कापसाचे दर 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले आहेत. 26/12/2022 रोजी देशातील बाजारात कापसाला सरासरी 7 हजार 500 ते 8 हजार 500 रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

50000 अनुदान मिळवण्यासाठी तात्काळ करा हे काम👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈


     सध्या ख्रिसमस आणि नव वर्षाच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील आठवडाभर व्यवहार बंद आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे सौदे होत नाहीत. याचाही परिणाम देशातील कापूस भावावर झालाय. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे खरेदीदार, निर्यातदार आणि ब्रोकर्स या काळात सुट्टी घेत असतात. केवळ कापूस नाही, तर सर्वच शेतीमालाचेही व्यवहार सध्या बंद आहेत. पण आपल्याकडे सोयाबीनच्या वायद्यांवर आधीच बंदी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर फारसा परिणाम जाणवणार नाही.तसंच देशातील वायद्यांमध्ये सध्या केवळ डिसेंबरचे व्यवहार सुरु आहेत. सेबीने अद्याप जानेवारी 2023 आणि त्यापुढील वायद्यांना परवानगी दिलेली नाही. म्हणजेच केवळ डिसेंबरच्या वायद्यांसाठीच व्यवहार सुरु आहेत. तेही 30 डिसेंबरला संपतात. याचाही मानसिक परिणाम कापूस दरावर होतोय. सेबी कापसाचे जानेवारी आणि पुढील वायदे आणणार की वायदेबंदी करणार? हा प्रश्न कायम असून बाजारात त्याचे पडसाद मागील काही दिवसांपासून उमटत आहेत.

पीएम किसान योजनेचे आपले स्टेटस चेक करा step by step मिळनार का 13 वा हप्ता👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈



Cotton bhav - दरवर्षी डिसेंबर हा जास्त आवकेचा महिना असतो. डिसेंबर-जानेवारी महिन्यात कापसाची आवक दरवर्षी भरपूर आसते. डिसेंबर आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापसाचे दर हंगामातील सर्वात कमी पातळीवर असतात. यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखला, त्यामुळं दर जास्त होते. मात्र दरात चढ उतार होऊन काही काळासाठी बाजारावर दबाव येईल, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी यापुर्वीच दिला होता. त्याप्रमाणं सध्या बाजार दबावात आलाय.


मोठी खुशखबर अखेरीस  50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली असे चेक करा आपले नाव👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈


चीनमध्ये कोरोना वाढल्याच्या बातम्यांचाही परिणाम बाजारावर जाणवतोय. मात्र, चीनमध्ये कोरोना दाखवला जातो त्या तीव्रतेचा नाही, असंही काही जणांचं म्हणणंये. पण काही असलं तरी चीन कापसाचा सर्वात मोठा ग्राहक असल्यानं त्याच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि पर्यायाने देशातील बाजारावरही परिणाम होत असतो.याचाच मानसिक परिणाम भारताच्या कापूस बाजारावर होत असल्याचं काही जणांचं म्हणणये.

रब्बी ई-पीक पाहणी कशी करावी step by step✅✅
👉👉येथे क्लिक करा👈👈



सध्या आपला बाजार सुरु असला तरी आंतरराष्ट्रीय बाजार बंद आहे. आता तुम्ही म्हणालं, त्यावरून आम्हाला काय घेणं देणं? पण कापसाचा बाजार केवळ देशापुरताच मर्यादीत नसून जागतिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी जास्त झाल्याचा परिणाम आपल्या बाजारावर थेट होत असतो. त्यामुळंच तर उद्योग मागील काही दिवसांपासून देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराची तुलना करून आयात शुल्क काढण्याची मागणी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 4 जानेवारीपासून व्यवहार सुरु होतील. चीनमधील कोरनाचे चित्रही जानेवारीच्या मध्यापर्यंत स्पष्ट होईल. चीनच्या मार्केटमधून मागणी वाढेल की घटेल याचा अंदाज स्पष्ट होईल. तसंच देशातील जास्त आवकेचा दबाव कमी होईल. त्यामुळं जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Pm kisan yojana नवीन नोंदणी सुरू अश्या प्रकारे करा  नोंदणी  step by step
👉👉येथे क्लिक करा👈👈


    पुढील दोन किंवा तीन आठवडे कापूस बाजारावर दबाव असेल. सध्या देशातील कापूस दराची तुलना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारही सुरु नाही. त्यामुळं घाबरून न जाता पॅनिक सेलिंग टाळावे आणि जानेवारीत परिस्थिती सुधारु शकते. आंतरराष्ट्रीय बाजारही सुरु होईल आणि मग त्यामुळं आणखी स्पष्टता येईल. त्यामुळं शेतकऱ्यांनी गरजेपुरता कापूस विकून शक्य असल्यास दर वाढेपर्यंत वाट पाहणेच सध्याच्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल, असे आवाहन जाणकारांनी केले.

कापसाचे भाव अजूनही कमीच सध्या काय मिळतोय बाजारभाव पहा
👉👉येथे क्लिक करा👈👈


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने