मागेल त्याला विहिर ; विहीरीसाठी चार लाख अनुदान Subsidy for wells

 

मागेल त्याला विहिर ; विहीरीसाठी चार लाख अनुदानSubsidy for wells



शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता विहीरीसाठी चार लाख रुपये एवढे अनुदान Subsidy मिळनार आहे.आपल्या कृषीप्रधान देशात 65 % लोकाचा व्यवसाय शेतीवर अवलंबुन आहे. पण दिवसेंदिवस शेती व्यवसाय हा अवघड होत चालला आहे. त्यामुळे सरकारकडुन विविध योजना राबवुन शेतकऱ्यांला आर्थिक मदत केली जाते.शेती करताना  पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो . विहीरीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल आवश्यक असते.म्हणुनच मनरेगा सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांला विहीरीसाठी अनुदान दिले जात आहे. यामधे मोठा बदल करुन अनुदानात वाढ करण्यात आली आहे.(Department of Agriculture)


 अंतराची महत्वपूर्ण अट रद्द !Subsidy

 शेतकऱ्यांला आता मनरेगा सिंचन योजने अंतर्गत मागेल त्याला विहिर Subsidy for wells  याप्रमाणे अनुदान Subsidy मिळनार आहे. या योजनेमधिल दोन विहिरीचे अंतर 150 मिटर असावे हि अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.हि अट रद्द झाल्यामुळे आता शेतकरी विहीरीसाठी अर्ज करु शकतील. दोन सिंचन विहिरीच्या मध्ये 150 मिटर अंतर हि बाब लागु राहनार नाही. हि महत्वपूर्ण अट रद्द केल्याने शेतकऱ्यांला मोठा फायदा मिळनार आहे.(Department of Agriculture)

 

 मागेल त्याला विहिर विहीरीसाठी लाभार्थी निवड अनुसूचित जाती अनुसूचित जमाती

1) भटक्या जमाती

2) निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)

3) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

4)स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे

5) शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे

6) जमीन सुधारणांचे लाभार्थी

7) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थीजे)

8) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी

9) सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)



 
मागेल त्याला विहीरीसाठी लाभार्थी पात्रता Subsidy for wells

1) लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.

2)महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.

3) दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.

4)दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.

5) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मी. अंतराची अट लागू राहणार नाही.

6) लाभधारकाच्या 712 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.

7)लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा

8) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.

10) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.


 मागेल त्याला विहिर विहीरीसाठी आवश्यक कागदपत्रे Subsidy for wells

1) 7/12 चा ऑनलाईन उतारा

2)  8 अ चा ऑनलाईन उतारा

3) जॉबकार्ड ची प्रत

4) सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा

5) सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.

 

 मागेल त्याला विहिर magel tyala vihir Gr Link Pdf  Click here

 

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने