या जिल्ह्याचा पीकविमा वाटप सुरु Kharip pik vima 2022

 

या जिल्ह्याचा पीकविमा वाटप सुरु Nanded Kharip pik vima 2022

 




नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती अधिसुचना लागु केली आहे.  नांदेड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, पुर, कीड रोग, पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे.  अशा स्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या Kharip pik vima 2022 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत मोठी मागणी केली जात होती.



बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी खुषालसिंह परदेशी यांनी ही अधिसुचना लागु केली आहे.नांदेड जिल्हयात १ जुलै ते ३०ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीनचे नुकसान दिसून आल्याने जिल्ह समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थितीमुळे पुर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट झाली असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.



 समितीच्या सर्वेक्षण अहवाला नुसार नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनी सोयाबीन, कापुस, तुर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना लागु केली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांला विहीत मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करणेबाबत युनायटेड इंडिया इन्शुरन्स विमा कपंनीस निर्देश दिले आहेत.


 Nanded Kharip pik vima 2022 टक्केवारी खालील प्रमाणे असणार आहे

 


 


 



 
 
 




एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने