पिक विमा रक्कम आठ दिवसात जमा करा crop insurance कृषीमंत्री सत्तार

 

 पिक विमा रक्कम आठ दिवसात जमा करा crop insurance कृषीमंत्री सत्तार




यावर्षी नैसर्गिक आपत्ती जसे अतिवृष्टी,पावसात खंड,किडरोगामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे (crop damage).नुकसानीचा दावा करुनही शेतकरी अजूनही विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर येत्या पाच दिवसांत कार्यवाही करून येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी अशा सूचना  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. (Agriculture)

 महाराष्ट्राचे कृषिमंत्री सत्तार यांनी पंतप्रधान पीक विमा योजना (crop insurance) खरीप 2022 मधील झालेल्या  नुकसानी संदर्भात  विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला.येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बॅक (bank) खात्यात विमा रक्कम जमा करावी असे सांगितले आहे. (Abdul sattar)
 



पिकवीम्याचे पैसे शेतकऱ्यांला मिळाले नाही तर ?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना (insurance company) जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. प्राप्त 51 लाख 31 हजार सूचनांपैकी 46 लाख 09 हजार अर्जांचे सर्वेक्षण झालेले आहे. प्रलंबित 05 लाख 21 हजार अर्जांवर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यात यावे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई रक्कम तत्काळ निश्चित करावी. विमा कंपन्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावीच लागेल, असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने