सावधान कुसुम सोलार पंपासाठी नवीन अर्ज करताय तुमची फसवणूक तर होत नाही ना. kusum pump


 

kusum pump

शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप ( kusum solar ) योजनेसाठी ( kusum mahaurja ) नवीन अर्ज करू इच्छिणाऱ्या व पैशाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना महाऊर्जाकडुन ( Mahaurja ) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, रात्री बेरात्री जागण्याची गरज पडु नये यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कुसुम कृषी सौर पंप  (MNRE PM-KUSUM ) योजना राबवत आहे,


प्रधानमंत्री कुसुम सौर ( pm kusum scheme ) योजनेच्या नावाखाली सोलरपंपा साठी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर साठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कुसुम योजनेच्या संबंधातील फसवे मेसेज पाठवले जातात, यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

महाऊर्जा विभागीय कार्यालयां अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेल मध्ये तक्रारी केल्या आहेत.


त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल application तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज ( kusum solar online application ) करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा ( kusum mahaurja payment ) करण्यास सांगितले जात आहे.

अशा खोट्या वेबसाइटसह मोबाईल ॲपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या फोन, मेसेज पासून सावध रहा अशा संकेतस्थळावर, ॲप वर ऑनलाईन पद्धतीने पैसे भरु नका, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.


 शेतकरी सोलार पंप मिळनार म्हणून एजंट ला काही पैसे देतात पण, ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शासनाच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व  नवीन ऑनलाईन नोंदणीसाठी ,पैशाचा भरणा करण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी.व फसवणूकीपासुन सावध रहावे. 



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने