31 जानेवारी 2023 चे मंत्रीमंडळ निर्णय Cabinet decision state

 

31 जानेवारी 2023 चे मंत्रीमंडळ निर्णय Cabinet decision state पहा सविस्तर 




(Cabinet decision state) मित्रांनो हिवाळी अधिवेशनानंतर भरपूर कालावधी नंतर 31/जानेवारी रोजी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडली असून यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती या लेखात घेणार आहोत. या मंत्रीमंडळ बैठकीत बर्याच योजनेत बदल करण्यात आले आहे. नवीन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तरी पाहुया कोणते निर्णय घेण्यात आले, पाहुया सविस्तर.

 

1)  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी 2023 पासुन ' जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गिताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्विकार करण्यात आला आहे. 

 


2)  खासगी कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांच्या पात्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीय विद्यार्थ्यांना लागु असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना अभीमत विद्यापिठाकरीता लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


3)  महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायम स्वरूपी विना अनुदानित तत्वावर नवीन 12 समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. 

 

4) राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50 व्या बैठकीत शिफारस क्रंमाक 34 नूसार अनुसूचित  क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. 


5)  सन 2022 च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदुपाने संकलनापासुंन जमा होणार्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजाती न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणार्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मंजूरी म्हणून देण्यात येणार आहे. 


6) महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र मैत्री कायदा 2022 या विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता परवानग्या सोप्या व जास्त वेगाने होणार आहे. यादृष्टीने यंत्रणेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

 

7)  भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पद भरतीच्या स्पर्धा परीक्षा टि. सी. एस. आयओएन व आय. बी. पी. एस. या कंपण्याकढुन घेताना उमेदवाराकडून आकारण्यात येणारे शुल्क निश्चित केले आहे.


8)  राज्यात दुधाळ जनावराचे गट वाटप करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनामधिल प्रती दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ करण्यात आली असून आता गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशी साठी 80 हजार रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. 


9) फलटण ते पंढरपूर या नवीन ब्राॅडगेज रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे येथे रेल्वे जाळे अधिक मजबूत होईल. 

 

10)  महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत परीपोषन अनुदानात 1225 वरुन 2500 रूपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


11) पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास 3976 कोटी 83 लाख रुपये तीसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागातील 10970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येनार आहे. 

 

12)  पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस 460 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील 63 गावात 25498 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करता येनार आहे.

 


उर्वरित मंत्रिमंडळ निर्णय येथे पहा 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने