Kukut Palan Online apply सदन कुक्कुटपालन विकास योजना अर्ज सुरु


Kukut Palan Online apply  सदन कुक्कुटपालन विकास योजना अर्ज सुरु




Kukut Palan Yojana : नमस्कार मित्रांनो कुक्कुटपालन अनुदाना करता राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबवली जाणारी ही एक महत्त्वाचे योजना आहे. या योजनेचे नाव आहे सदन कुक्कुटपालन विकास योजना याच योजना चे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत या योजनेबद्दल आज आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही योजना महाराष्ट्र राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबविली जाते.या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला 5 लाखापेक्षा अधिक अनुदान कुकूटपालन करण्यासाठी दिले जाते. मित्रांनो ही योजना राबवत असताना ज्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये या योजनेसाठी लक्षांक उपलब्ध होतील त्या जिल्ह्याकरिता या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जातात. Kukut Palan Online apply


मित्रांनो ही योजना सध्या बुलढाणा जिल्ह्यासाठी सुरू झालेली आहे व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2023 असणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळील पंचायत समिती कार्यालयाला भेट द्या.
Kukut Palan

सदन कुक्कुट विकास योजना अटी व शर्ती
तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तर 'तुम्ही सर्वसाधारण प्रवर्ग किंवा अनुसूचित जातीतील बांधव या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ज्या लाभार्थ्यांकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेला प्राधान्य दिले जाईल. तुम्हाला जर कुकूटपालन व्यवसाय करून स्वयम रोजगार निर्माण करायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. सर्व बाबी लक्षात घेऊन लाभार्थ्याची निवड या योजनेसाठी केली जाईल Kukut Palan Yojana


योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ?
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 60 वर्षे असणे गरजेचे आहे.
• या योजनेसाठी महिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे.
• प्रति तालुका एक प्रमाणे या योजनेसाठी निवड करण्यात येईल.
• लाभार्थ्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2500 चौरस फूट स्वतःच्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे.
• ज्या जागेवरती कुक्कुटपालन करावयाचे आहेत त्या जागेवरती पाण्याची सोय असणे गरजेचे आहे.
• कुकुट पालन साठी लाईटची सोय असणे देखील गरजेचे आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
३. ७/१२ उतारा
4. ८/अ उतारा
5. कुकुट पालन व्यवसायाची प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र.
6. अर्जदार अनुसूचित जाती जमाती मधील असल्यास जातीचे प्रमाणपत्र

 


योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा ? शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्ही या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठीतुमच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय पशुसंवर्धन उपायुक्त तसेच पशुसंवर्धन विकास अधिकारी पंचायत समिती याच्याशी भेटून सविस्तर माहिती मिळवू शकता धन्यवाद...

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने