सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर होणारे परीणाम. pik niyojan
नमस्कार शेतकरी मित्रांनो चांगले उत्पादन घेण्यासाठी आपले शेतकरी मित्र रासायनिक खताचा वापर करत असतात.पण नत्र,स्पुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्या सोबत पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची तेवढीच गरज असते.याकडे बरेच शेतकरी दुर्लक्ष करत असतात परीणामी उत्पादनात घट होत असते.या लेखात सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरते मुळे पिकावर होणारे परीणाम व त्यावर कोणती उपाय योजना करावी ते पाहुया.
नत्राची कमतरता : पाने पिवळी होतात,झाडाची व मुळाची वाढ थांबते.फुले, फळे कमी लागतात. उपाय : 1℅युरिया ची फवारणी करावी ( दहा लिटर पाणी +100 gm .)
स्पुरद ची कमतरता : पाने हिरवट व लांब होऊन वाढ खुंटते, पानाच्या मागची बाजु जांभळट होते. उपाय: 1%डायमोनियम फाँस्फेट ची फवारणी करावी.(100 gm.+10 लिटर पाणी )
पालाश ची कमतरता : पानाच्या कडा तांबटसर होऊन पानावर पिवळे व लाल ठिपके पडतात.झाडाचे शेंडे गळुन पडतात व खोड अखुड होते. उपाय : फेरस अमोनियम सल्फेट ची फवारणी करावी.( 50 gm+10 लिटर पाणी)
बोराँन ची कमतरता : झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरी होऊन मरतात. सुरकुट्या पडुन पिवळे चट्टे पडतात. फळावर लालसर ठिपके पडुन भेगा पडतात. उपाय : 5-10gm बोरीक असीड पावडर ची 10 लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
गंधक ची कमतरता : झाडाच्या पानांचा हिरवा रंग कमी होऊन नंतर पाने पुर्ण पिवळी पडतात. उपाय : 20-40 किलो गंधक हेक्टरी जमीनीतुन द्यावी.
तांबे ची कमतरता : झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते,डायबँक नावाचा रोग होतो.खोडाची वाढ कमी होते आणि पाने गळतात. ऊपाय : 40 gm मोरचुद 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
लोहाची कमतरता : शेंड्याच्या पानाच्या शिरामधिल भाग पिवळा होतो. झाडाची वाढ थांबते. उपाय : फेरस अमोनियम सल्फेट ची फवारणी करावी.( 50gm +10 लिटर पाणि )
मुख्य अन्नद्रव्या सोबत सुक्ष्म अन्नद्रव्याची पिकाला तेवढीच आवश्यकता असते.चांगल्या उत्पादनासाठी सुक्ष्म अन्नद्रव्याचा पिकात अवश्य वापर करावा.